By  
on  

पाहा Video : ... अन् मनसेच्या सैनिकांनी केली धुलाई, अमेय खोपकर म्हणतात, पुन्हा असा गलिच्छ प्रकार होऊ देणार नाही

सध्या मनोरंजनविश्वात अनेक चित्र-विचित्र प्रकार घडातायत. त्यात कमी की काय म्हणून आणखी एक गलिच्छ प्रकार नुकताच घडला. याचा संपूर्ण घटनाक्रम महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी व्हिडीओ शेअर करत सांगितला आहे आणि फक्त सांगितलाच नाही, तर त्यांनी त्या बदमाशांची कशी धुलाई केली याचासुध्दा व्हिडीओ शेअर केला आहे. 

एका मराठी अभिनेत्रीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष पद्मनाभ राणे यांना फोन करुन यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली होती. या अभिनेत्रीने दिलेल्या माहितीनुसार तिला चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका देण्यात आल्याचं सांगितलं. मात्र हा रोल हवा असेल तर उद्या या चित्रपटाचे निर्माते उत्तर प्रदेश लखनऊमधून मुंबईत येणार आहेत. तर तुला त्यांना खूष करावं लागेल, तुला कॉम्प्रमाइज करावं लागेल. असं केलं तरच तुला त्या मोठ्या चित्रपटात रोल दिला जाईल असं या अभिनेत्रीला सांगण्यात आल्याचं खोपकर म्हणाले. या अभिनेत्रीने घरच्यांना विश्वासात घेऊन त्यांना सगळं सांगितलं. त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना कळवल्यानंतर या लोकांना ट्रॅप करुन ताबडतोब पोलिसांच्या हवाली करण्यास सांगितलं. घोडबंदर रोड येथील एका फार्म हाऊसवर ही मुलगी गेली तेव्हा मनसेचे पदाधिकारीही तेथे पोहचले. मनसे पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांनी या चौघांना चांगलाच चोप दिला. या चौघांकडे कट्टेपण सापडलेत. गिरिजेश यादव, बिरालाल यादव, राहुल यादव आणि कंचन यादव अशी या चौघांची नाव असल्याचं खोपकर यांनी सांगितलं.

 

मुलीच्या तक्रारीनंतर मनसे कार्यकर्ते तिथे पोहचले आणि त्यांनी त्या फसवणूक करणा-या निर्मात्यांची धुलाईच सुरु केली. सोबत मदतीसाठी मनसेच्या महिला कार्यकर्त्यासुध्दा सोबत होत्या. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive