अंकुश चौधरी करणार छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन

By  
on  

करोना काळानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात शूटींगला उत्साहात सुरुवात झाली. या पुनश्च हरिओममध्ये रसिक प्रेक्षकांना अनेक सुखद धक्के मिळाले. विविध मालिका आणि शोजची पर्वणी तर मिळालीच पण अनेक बड्या कलाकारांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. यात महाराष्ट्राचा फेव्हरिट अभिनेता अंकुश चौधरी हे नावसुध्दा सामिल होत आहे. अभिनेता अंकुश चौधरी आता परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'मी होणार सुपरस्टार' या स्टार प्रवाह वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या डान्स रिअॅलिटी शो मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

या ग्रॅण्ड रिअलिटी शोविषयी सांगताना अंकुश म्हणाला, ‘पंधरा वर्षांनंतर पुन्हा एकदा टेलिव्हिजनकडे वळताना अतिशय आनंद होत आहे. विशेष म्हणजे मी महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रवाहसोबत पहिल्यांदाच जोडला जातोय आणि जजची भूमिकाही पहिल्यांदाच पार पाडतोय. डान्स हा माझ्या अतिशय आवडीचा विषय आहे. या शोमध्ये जरी मी जज असलो तरी मी टीव्हीसमोर बसलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिनिधीची जबाबदारी पार पाडणार आहे. फरक एवढाच असेल की प्रेक्षक या कार्यक्रमाचा आनंद घरबसल्या घेतील आणि मी प्रत्यक्ष घेईन. मी होणार सुपरस्टार हा कार्यक्रम नवी ऊर्जा घेऊन येणार आहे. पुन्हा एकदा तीच उर्मी आणि तोच उत्साह या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनुभवायला मिळेल. त्यामुळे मी या शोसाठी प्रचंड उत्सुक आहे. तेव्हा पाहायला विसरु नका मी होणार सुपरस्टार २१ ऑगस्टपासून दर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.’

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

'मी होणार सुपरस्टार' हा कार्यक्रम २१ ऑगस्टपासून स्टार प्रवाह वाहिनीवरून प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील नृत्यप्रेमींना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी एक मोठा मंच मिळणार आहे. 

 

 प्रसाद ओक, सई ताम्हणकर, स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, उमेश कामत  हे देखील छोट्या पडद्यावर दिसत आहेत. आता त्यांच्या बरोबरीने मराठीतील सुपरस्टार अंकुश सामिल होत आहे. 

 

Recommended

Loading...
Share