ओम राऊतच्या'आदिपुरुष'मध्ये हा मराठमोळा अभिनेता साकारणार हनुमान

By  
on  

 
तानाजीनंतर ओम राऊत ‘आदिपुरुष’ या महत्त्वाकांक्षी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ऑगस्ट 2020मध्ये ओम राऊतने आदिपुरुष या सिनेमाची अनाउसमेंट केली. प्रभास स्टारर या सिनेमात सैफ अली खान, क्रिती सेनन आदि कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे.

 

 

या सिनेमात अनेक मराठी कलाकार झळकत आहेत. आता या सिनेमात हनुमानाच्या व्यक्तिरेखेत देवदत्त नागे दिसणार असल्याचं बोललं जात आहे. या भूमिकेत फिट होण्यासाठी देवदत्त फिटनेसवर मेहनत घेत असल्याचंही समजत आहे. देवदत्तसोबतच या सिनेमात तृप्ती तोरडमल आणि अभिनय बेर्डे झळकणार असल्याचंही समजत आहे.

Recommended

Loading...
Share