Video : अन् तुम्ही काय बी म्हणा..! आपल्या गौराबाईने तिचं हे स्वप्न केलं पूर्ण

By  
on  

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील सर्वांची लाडकी गौराबाई म्हणजेच गौरी खुपच लाडकी आहे. गौरी –जयदीपची ही केमिस्ट्री प्रेक्षकांना खुप भावते. मालिकेत गौराबाई नवनवी आव्हानं स्विकारताना दिसते. यात तिला जयदीपची खंबीर साथ मिळते.

गौरी साकारणारी गोड-गोजिरी अभिनेत्री गिरीजा प्रभू सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. तिचा खुप मोठा  चाहता वर्ग आहे. गौरीने नुकताच एक कारनामा केला आहे. हा आनंद तिने सोशल मिडीया पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांशी शेअर केला आहे. 

गिरीजाचं स्वप्न सत्यात उतरलंय. तिने एक नवी कोरी कार खरेदी केलीय. त्याचाच छान व्हिडीओ तिने अपलोड केला आहे.

गौरी फेम गिरीजाच्या या कारनाम्याबदद्ल चाहते आणि सेलिब्रिटी मित्र-मंडळींकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. 

 

Recommended

Loading...
Share