ट्रेंड होत असलेल्या या गाण्यावर प्रिया-उमेशची धमाल मस्ती, पाहा व्हिडियो

By  
on  

सोशल मिडियावर कधी काय ट्रेंड करेल सांगता येत नाही. सध्या एक गाणं सोशल मिडियावर ट्रेंड होताना दिसत आहे. सेलिब्रिटीही या ट्रेंडसोबत व्हिडियो पोस्ट करताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर ‘बचपन का प्यार’ हे गाणं ट्रेंड होतं आहे. 
मराठमोळी जोडी प्रिया आणि उमेशही या गाण्यावर धमाल करताना दिसत आहेत.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat)

 

उमेश आणि प्रियाने देखील ‘बचपन का प्यार’ या व्हायरल गाण्यावर रील शेअर केलंय. उमेश कामतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत उमेशने पेल रोझ कलरचा ब्लेझर तर प्रियाने रेड वनपीस परिधान केला आहे. या जोडीच्या व्हिडियोवर फॅन्सच नाही तर सेलिब्रिटीही कमेंट करत आहेत. आशुतोष गोखले आणि मिथिला पालकर यांनी या दोघांचं कौतुक केलं आहे तर अमृता खानविलकरने “ओ माय गॉड ..मला विश्वास बसत नाहिय तुम्ही लोकांनी हे केलं.” अशी कमेंट केली आहे.

Recommended

Loading...
Share