मराठी सिनेविश्वातली आघाडीची अभिनेत्री प्रार्थना बेहरे आपल्या सिनेमांमधून रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येते. प्रार्थनाने अनेक सुपरहिट सिनेमांमधून रसिकांची मनं जिंकली आहेत. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणा-या प्रार्थनाचा खुप मोठा चाहता वर्ग आहे.
करोना काळात मनोरंजन विश्वात अनेक उलथापालथ झाली. मोठा पडदा गाजवणारे कलाकार आपसूकच छोट्या पडद्यावरुन रसिकांच्या भेटीला येऊ लागले. याच यादीत आता प्रार्थनाच्या नावाचाही समावेश होतोय. संजय नार्वेकर, अजिंक्. देव, मुक्ता बर्वे, अंकुश चौधरी, उमेशमकामात, सचिन खेडेकर यांच्यानंतर आता श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे हे कलाकारसुध्दा छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन करतायत. माझी तुझी रेशीमगाठ या नव्या मालिकेतून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.
महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत प्रार्थना सांगते, चाहते आपल्याला पाहायला उत्सुक असतात. परंतु, जेव्हा तुम्ही सगळ्यांच्या दृष्टीआड होता तेव्हा तुम्ही इतरांच्या डोक्यातूनही निघून जाता. तुम्ही काय करता याचा कोणाला फारसा फरक पडत नाही. त्यामुळे इथे तुम्हाला तुमच्या असण्याची समोरच्याला जाणीव करून द्यावी लागते. मी प्रेक्षकांच्या विस्मरणात जाऊ नये म्हणून मी मालिका करण्याचा निर्णय घेतला. मी अनेक वर्षांनंतर मालिका करत आहे त्यामुळे दिग्दर्शकांना मी मला नवीन कलाकाराप्रमाणे वागणूक देण्यासाठी बजावलं आहे कारण मला बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत.'
(Source - Maharashtra Times )