लाल इश्क,ये मलाल इश्क..! रिंकू राजगुरुचा साज पाहून चाहते सैराट

By  
on  

सैराट सिनेमानंतर अभिनेत्री रिंकू राजगुरु सुसाट सुटली. सैराटची आर्ची ही ओळख कधीच मागे सोडत रिंकू सध्या अनेक मराठी सिनेमे, हिंदी वेबसिरीज यांमधून रसिकांच्या भेटीला येतेय. सैराटसाठी आपल्या पहिल्याच पदार्पणातील व्यक्तिरेखेसाठी रिंकूने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. आता ती अनेक आव्हानात्मक भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येतेय. दरम्यान सोशल मिडीयावरुनही रिंकू चाहत्यांची मनं जिंकतेय. 

नुकतंच लाल रंगाच्या भरजरी साडीतलं नववधूसारखं एक जबरदस्त फोटोशूट नुकतंच रिंकूने चाहत्यांशी शेअर केलं आहे. 

ये लाल इश्क,ये मलाल इश्क,ये ऐब इश्क,ये बैर इश्क  अशा ओळी कॅप्शनला देत रिंकूने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

रिंकूने तिच्या नजाकत आणि अदाकारीने सजलेले हे छानसे फोटो पोस्ट केले आहेत. पाहताच क्षणी तुम्हीसुध्दा  तिच्या प्रेमात पडाल.

 रिंकूच्या या अदांवर चाहतेच काय पण इतर सेलिब्रिटीसुध्दा  फिदा झाले असून त्यांनी त्यावर लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

Recommended

Loading...
Share