By  
on  

डेस्टिनेशन डोहाळे जेवण ! पुण्यातील ढेपेवाडा येथे पारंपारिक पध्दतीने पार पडलं या मराठी अभिनेत्रीचं डोहाळे जेवण

प्रसिध्द मराठी यूट्यूबर आणि अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने पतीसोबत एक खास फोटोशूट करत आपण आई होणार असल्याची गुड न्यूज काही महिन्यांपूर्वी चाहत्यांना दिली होती. उर्मिलाने नुकतीच सोशल मीडिया वर एक पोस्ट केली ज्यात तिचं डोहाळे जेवण पार पडल्याचं तिनं व्हिडीओ शेअर करत सांगितलं आहे.

 

 

उर्मिलाच्या ह्या पोस्ट वर चाहत्यांसोबतच सेलेब्रिटींनी देखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

महत्त्वाचं म्हणजे उर्मिलाचं हे डेस्टिनेशन डोहाळे जेवण आहे.

 

 पुण्यातील ढेपेवाडा येथे पारंपारिक आणि साग्रसंगीत पध्दतीने उर्मिलाचा हा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला.

 

 

 

यूट्यूबर असलेल्या उर्मिलाने ह्या शाही डोहाळे जेवणाचा थाट खास व्लॉग रिलीज करत चाहत्यांपर्यंत पोहचवला आहे.

 

 

हिरवीगार जरीकाठाची साडी त्यावर गुलाबी ब्लाऊज पारंपारिक दागिने आणि कर्णफुल अशा अस्सल मराठमोळ्या साजात सजलेली उर्मिला खुपच गोड दिसतेय.

काहींनी उर्मिलाला ट्रोलसुध्दा केलं आहे त्यांना तिने सणसणीत उत्तर दिलं आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive