By  
on  

‘भिकारी’सिनेमाला 4 वर्षं पुर्ण झाल्यानिमित्त स्वप्नील जोशीने शेअर केली खास पोस्ट

प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांचं दिग्दर्शन असलेला मराठी सिनेमा म्हणजे भिकारी. अभिनेता स्वप्नील जोशी या सिनेमात मुख्य भूमिकेत होता. या सिनेमाने नुकतीच चार वर्षं पुर्ण केली आहेत. खरच.. आयुष्यात माणूस कितीही पुढे गेला तरी आई विना काहीच नसतो. म्हणुनच म्हणतात नास्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी...
4 years of Bhikari movie ! Give a tight hug to your mother and tell her that you love her.

 

 

स्वप्नील या सिनेमात धनाढ्य सम्राट जयकरच्या व्यक्तिरेखेत दिसला होता. आईसाठी कोणतंही आव्हान स्विकारणा-या सम्राटला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली होती.  स्वप्नीलसोबत या सिनेमात रूचा इनामदार, माधव अभ्यंकर, गुरू ठाकूर, सयाजी शिंदे, मिलिंद शिंदे यांच्याही भूमिका होत्या.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive