By  
on  

ठरलं तर ! अभिनेता हार्दिक जोशी या मालिकेतून दिसणार छोट्या पडद्यावर

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेला इतकी वर्षी झालेली असतानाही प्रेक्षक या मालिकेची अजून आठवण काढतात. अभिनेता हार्दिक जोशी या मालिकेत राणादाच्या भूमिकेत दिसला. राणादाचा स्वभाव, त्याचं वागणं बोलणं या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना खास आवडल्या. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना राणादाने मोहात पाडलं. 

 

 

आता पुन्हा एकदा हार्दिक मालिकेत दिसणार आहे. एका प्रथितयश वृत्तपत्राने याबाबतची माहिती दिली आहे. हार्दिक ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेत नायिकेच्या भूमिकेत अभिनेत्री “अमृता पवार” झळकणार आहे. सोनी मराठी वरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेतून अमृता पवारने जिजामातोश्रींची भूमिका साकारली होती. आता चाहते हार्दिकच्या भूमिकेच्या बाबतीत उत्सुक असतील यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive