आजवर आपण अभिनेता स्वप्नील जोशीला विविध ओटीटी माध्यमावर पाहिलं आहे. पण आता स्वप्नील स्वत:चा ओटीटी प्लॅटफॉर्म घेऊन येण्यासाठी सज्ज झाला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर भारतीय प्रादेशिक भाषांमधील कार्यक्रम प्रामुख्याने असतील. हिंदी, मराठी, बंगाली आणि प्रादेशिक भाषांमधील सिनेमा, वेब सीरीज आणि मालिका या ओटीटीवर पाहायला मिळतील. ‘टामोरा डीजीवर्ल्ड’ या आपल्या कंपनीच्या माध्यमातून तो हे ओटीटी प्लॅटफॉर्म लॉन्च करत आहे.
या प्रकल्पात त्याच्यासोबत उद्योगपती नरेंद्र फिरोदिया असणार आहेत. स्वप्नीलने पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. २०२० मध्ये आलेल्या करोनाच्या महामारीमुळे सगळं जगच थांबलं. आता पुढे काय असे विचार सतत डोक्यात येत होते. अखेर दीड वर्षांनंतर त्याचं उत्तर सापडलं. माझी कंपनी टमोरा डीजीवर्ल्ड लवकरच प्रादेशिक ओटीटी प्लॅटफॉर्म घेऊन येते आहे. मी अनेक दिवस या स्वप्नावर काम करत होतो. होय तुम्ही बरोबर वाचलतं. आम्ही लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्म घेऊन येत आहोत’ अशा आशयाचं कॅप्शन त्याने दिलं आहे.
नरेंद्र यांच्याबाबत बोलताना स्वप्नील म्हणतो, ‘नरेंद्र लेट्सफ्लिक्स’ या ओटीटीची योजना आखली होती. त्यावर ते प्रादेशिक भाषांमधील कार्यक्रम दाखवणार आहेत. आम्ही त्याबाबत चर्चा केली आणि त्यानंतर दोघांनीही एकत्र येण्याचे आलो. लेटफ्लिक्स आणि टमोरा डिजीवर्ल्ड एकत्र काम करतील.’