सोनी मराठी वाहिनी नवनवीन मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी नेहमीच सज्ज असते.अभिनेत्री सायली देवधर हिची मुख्य भूमिका असलेली 'वैदेही' - शतजन्माचे आपुले नाते, ही मालिका 16 ऑगस्टपासून सोम.-शनि., संध्या. 7:30 वा. प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
देव दिखाव्याला नाही श्रद्धेला पावतो, असं सांगणार्या या मालिकेत वैदेही ही रामाची निस्सीम भक्त आहे. तिच्या चांगल्या स्वभावामुळे ती दुसऱ्यांना नेहमी मदत करत असते. सालस आणि समंजस स्वभावाची वैदेही आपल्या कुटुंबासाठी, आपल्या बहिणींसाठी नेहमी खंबीर उभी आहे आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी संभाळतेय. या मालिकेत अभिनेत्री पल्लवी अजय पाटील आणि तृष्णा चंद्रात्रे यासुद्धा दिसणार आहेत. सोनी मराठी वाहिनीची ही मालिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असं वाटतंय.