By  
on  

अपूर्वा नेमळेकरच्या नो मेकअप लुकवर चाहते फिदा, मनमोहक हास्याने जिंकली चाहत्यांची मनं

रात्रीस खेळ चाले मालिकेतील शेवंता साकारुन सौंदर्यवती अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने छोटा पडदा गाजवला. कोकणात घडणा-या रहस्यमय आणि थरारक काल्पनिक कथेतलं शेवंता हे अपूर्वाने साकारलेलं पात्रं आज महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोहचलंय. या भूमिकेमुळे तिला अमाप लोकप्रियता मिळाली, म्हणूनच चाहत्यांसाठी अपूर्वा नेहमीच सोशल मिडीयावर सक्रीय असते. 

आपले नानाविविध स्टाईलचे फोटोशूट, धम्माल व्हिडीओज या माध्यमांतून अपूर्वा सतत चाहत्यांच्या संपर्कात असते. 

अपूर्वाने नुकतंच एक लय भारी फोटोशूट चाहत्यांशी शेअर केलं आहे. या फोटोंचं विशेष म्हणजे निखळ हास्याच्या जोरावर हे फोटोशूट चाहत्यांचं लक्ष वेधून  घेतंय. 

अहो, म्हणजेच या फोटोशूटसाठी अपूर्वाने कुठलाच अतिरिक्त मेकअप वा भरजरी आऊटफिट कॅरी केलेलं नाही. 

हे नो मेकअप फोटोशूट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असून त्यावर त्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. 


 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive