By  
on  

‘जाती के बारे में क्यो न बोलू सर’, रिंकू राजगुरुच्या ‘२०० हल्ला हो’चा पाहा ट्रेलर

सैराटच्या अभतपूर्व यशानंतर आपली आर्ची फेम लाडकी अभिनेत्री रिंकू राजगुरु आता तिची नवी ओळख प्रस्थापित करु पाहतेय. मराठीसोबतच रिंकू हिंदीतही तिच्या अभिनयाची छाप पाडतेय. लारा दत्तासोबत हंड्रेड या वेबसिरीजमध्ये जबरदस्त भूमिका साकारल्यानंतर रिंकू लवकरच ‘२०० हल्ला हो’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालेला असून सोशल मीडियावर खुप चर्चेत आहे.
 

महत्त्वाचं म्हणजे अमोल पालेकर यांच्यासोबत स्क्रिन शेअर करण्याची संधी रिंकूला या आगामी वेबसिरीजमधून मिळतेय. 
 

दलित महिलांवर होणारे अत्याचार ह्या ज्वलंतत विषयावर ही सिरीज भाष्य करते. रिंकू या अन्यायाविरोधात सिस्टिमशी बेधडक लढताना पाहायला मिळतेय. पुन्हा एकदा ती आपल्या दमदार अभिनयाने या सिरीजमधून प्रेक्षकांची मनं जिंकणार हे नक्की. 
 

 

‘२०० हल्ला हो’ हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात रिंकू राजगुरुसोबत अमोल पालेकर, उपेंद्र लिमये आणि बरुण सोबती मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सार्थक दासगुप्ता यांनी केले आहे. हा चित्रपट २० ऑगस्ट रोजी झी ५ एपवर प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive