By  
on  

‘माझ्या बायकोचं जेनेलिया नाही...... तर’ रितेश देशमुखचं ट्वीट चर्चेत

रितेश-जिनिलिया या क्युट जोडीबाबत जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. अलीकडेच जेनेलियाने नुकतंच आपला ३४ वा वाढदिवस साजरा केला. पती रितेश देशमुखने सुद्धा आपल्या खास अंदाजात जिनिलियासाठी वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या. 
या दरम्यान रितेशच्या एका ट्वीटने लक्ष वेधलं.

 

 

 

रितेशने या ट्वीटमध्ये लिहिलं की, ‘माझ्या बायको चे नाव ‘जिनिलिया’ आहे … जेनेलिया नाही.’ या ट्वीटवर अनेक नेटिझन्स गमतीशीर कमेंट करत आहेत. काही तर ‘आता एक उखाणा होऊन जाऊदे भाऊ’ अशीही कमेंट केली आहे. रितेशने सोशल मिडियावर बर्थ डे सेलिब्रेशनचा व्हिडियोही शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जेनेलियाच्या वाढदिवसाचं फॅमिली सेलिब्रेशन दिसून आलं. जेनेलिया आणि रितेशची दोन मुलं रियान आणि राहिल व त्यांच्यासोबत भाची आणि भाचे सगळे एकत्र जेनेलियासाठी हॅपी बर्थ डे गाणं गाताना दिसून आले.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive