मीमी’ सिनेमानंतर तिचं सर्व स्थरावरुन कौतुक होताना दिसतंय. सई एक मुस्लिम महिलेच्या भूमिकेत पाहायला मिळाली. तिच्या या व्यक्तिरेखेबाबत पीपिंगमून मराठीशी तिने दिलखुलास बातचीत केली. सई म्हणते, या स्क्रिप्टने मला आकर्षित केलं. अशा प्रकारचं काम मी कधीच केलं नव्हतं.
या व्यक्तिरेखेमुळे नव्या गोष्टी करण्याची संधी मिळाली. ओटीटी माध्यमामुळे हा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचला याचा आनंद खुप आहे. लव्ह सोनिया आणि हंटर नंतर मला एकसारख्या भूमिका येत राहिल्या. त्यामुळेच हटके व्यक्तिरेखेसाठी मला वाट पहावी लागली. मला शमा आवडते कारण तिने स्वत:चा मार्ग निवडला आहे. रुढीप्रिय घरात जन्म घेऊनही तिने स्वत्व जपलं आहे. त्यामुळेच शमा ही व्यक्तिरेखा माझी आवडती आहे. तिच्यासारखे आणखी सशक्त रोल पुढेही मिळोत अशी आशा करायला हरकत नाही.’