By  
on  

Photos : मालदिवमध्ये पतीसह मुक्कामाला असलेल्या अप्सरेच्या रिसॉर्टचे एक दिवसाचे भाडे माहितेय का?

तुम्हा सर्वांनाचा माहितीय की, गेल्या काही दिवसांपासून आपल्या महाराष्ट्राची लाडकी अप्सरा अभिनेत्री म्हणजेच सोनाली कुलकर्णी ही गेल्या काही दिवसांपासून मालदिव्समध्ये पतीसोबत व्हेकेशन एन्जॉय करतेय. 

सोनालीचा पती कुणालचा 4 ऑगस्ट रोजी वाढदिवस होता. या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठीच हे कपल मालदिव्समध्ये आहे. 

सोनाली सोशल मिडीयावरुन सतत मालदिव्समधले आपले विविध मनमोहक फोटो चाहत्यांशी शेअर करतेय. 

मालदीव हे स्वच्छ, निर्मळ आणि मन मोहून टाकणाऱ्या सुंदर समुद्र किनाऱ्यांसाठी जगभर प्रसिद्ध आहे.

पाहताच क्षणी आपण मालदिव येथील निसर्ग सौंदर्यांच्या प्रेमात पडतो. 


सोनाली आणि तिचे पती हे मालदीवमध्ये कंदीमा (Kandima) रिसॉर्टमध्ये  मुक्कामाला आहेत. 

हे रिसॉर्ट खुप सुंदर असून अनेक देश-विदेशातील पर्यटक येथे मुक्काम करतात. 

कंदीमा रिसॉर्टमध्ये राहण्यासाठी काही पर्याय उपलब्ध आहेत. 

यातील हनिमून एक्वा पूल व्हिलामध्ये सोनाली तिच्या नवऱ्यासोबत राहत आहे.

या व्हिलामधून अथांग पसरलेल्या समुद्राचं विहंगम दृश्य नजरेस पडतं. यात खाजगी पूल जोडूनच आहे. 

 

सोनाली राहत असलेल्या हनिमून व्हिलाचे प्रतिदिवसाचे भाडे 2,455.88 डॉलर आहे.

भारतीय रुपयांत याची किंमत ही  साधारण दीड ते दोन लाखांच्या आसपास आहे.

मालदीवच्या कंदीमा रिसॉर्टमधील हनिमून व्हिलामध्ये जर तुम्ही दोन दिवस राहण्यासाठी गेलात तर, तुमचे दोन दिवसांचे चार्जेस साधारण 4 लाख 50 हजार 536 रुपये इतके होतात.

 

पण महत्त्वाचं म्हणजे कंदिमा रिसॉर्टमध्ये हनिमून व्हिला बुकृृ करण्यासाठी तुम्हाला 1-2 महिने आधीच बुकींग करायला लागेल. 

 

कंदिमा हे आलिशान आणि सर्व सुख-सोयींनी समृध्द असं रिसॉर्ट म्हणून प्रसिध्द आहे. 

 

 

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive