By  
on  

दादा कोंडकेंच्या लूकमधील आठवणींना भरत जाधव यांनी दिला उजाळा

आपल्या हटके अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकणारे दादा कोंडके यांची आज जयंती. दादांच्या सिनेमांनी मराठी सिनेमाचा नवा पैलू समोर आणला. आज दादांच्या आठवणींना उजाळा दिला जातो आहे. भरत जाधव यांनी पोस्ट मधून दादांची आठवण शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, ‘आज दादांचा वाढदिवस आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

 

अनेक लोकांना वाटते की, गंभीर भूमिका (सीरियस रोल) करणारा ग्रेट अ‍ॅक्टर असतो. उलट तशा प्रकारच्या भूमिकांपेक्षा कॉमेडी करणे, दहापट अधिक कठीण आहे. गंभीर भूमिका करताना बॅकग्राऊंड म्युझिक किंवा विषयाचा अभ्यास करून अभिनय करता येतो. मात्र कॉमेडी करताना या सर्व गोष्टी नसतात. आज इतक्या वर्षांनंतरही आपण दादांचे चित्रपट एन्जॉय करतो ते केवळ डबल मिनींग डायलॉग किंवा शाब्दिक कोट्यांमुळे नाही तर त्यांच्या टायमिंग, शब्दफेक आणि विनोदात असलेल्या इनोसन्स मुळे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive