By  
on  

ओम राऊतने लाँच केलं तानाजी सिनेमातील या मित्राच्या सिनेमाचं पोस्टर

ओम राऊतच्या तानाजी सिनेमाला प्रेक्षकांचं कौतुक मिळालं. या सिनेमात चुलत्याची व्यक्तिरेखा साकारणारा कैलाश वाघमारे भाव खाऊन गेला. आता ओमने नुकतच मित्र कैलाशच्या आगामी सिनेमाचं पोस्टर लाँच केलं आहे. ‘हिरवी’ असं या आगामी सिनेमाचं नाव आहे. माणूस आणि निसर्ग यातील ऋणानुबंधांवर हा सिनेमा बेतला आहे.

 

 

अ‍ॅग्नेल रोमन हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. कैलाश आणि पत्नी मीनाक्षी राठोड या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. ओम या सिनेमाबाबत म्हणतो, ‘मी हिरवीच्या टीमला शुभेच्छा देतो. माणूस आणि निसर्गाच्या सुंदर नात्यावर आधारित या सिनेमाला प्रेक्षकांचा प्रतिसाद नक्कीच मिळेल.’

Author

Recommended

PeepingMoon Exclusive