'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत वहिनीसाहेबांची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर. वहिनीसाहेब या भूमिकेमुळे धनश्री महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचली. धनश्री काडगावकर ही एक न्यू मॉमी आहे. काही महिन्यांपूर्वीच तिने एका गोंडस चिमुकल्याला जन्म दिला आहे. कबीर असं धनश्री आणि तिचे पती ध्रुवेश यांनी बाळाचं नामकरण केलं आहे.
धनश्री सोशल मिडीयावर बरीच सक्रीय असते. सोशल मिडीयावर सध्या “बचपन का प्यार… या गाण्याने धुमाकूळ घातलाय. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनाच ह्या गाण्याने वेड लावलंय. नुकताच धनश्रीने तिच्या लाडक्या लेकासोबत ‘बचपन का प्यार’ गाण्यावर धमाल व्हिडीओ शेअर केलाय. यात धनश्रीचा मुलगा कबीर खूपच गोड दिसतोय. कॅप्शनमध्ये , “बचपन का प्यार…हे तर करायचंच होतं” असं तिने लिहिलंय.
धनश्रीच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.