By  
on  

फ्रेशर्सच्या टीमचं धमाल रियुनियन, थिरकले या ट्रेंडवर

तुमच्या-आमच्या कॉलेजमधील मखमली दिवसांची आठवण करुन देणारी मालिका म्हणजे फ्रेशर्स. तरुणाईसाठी असलेली ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. ही मालिका पाहताना प्रत्येक पात्र हे आपल्यातलंच एक आहे अशी भावना निर्माण झाल्याशिवाय रहात नाही. या मालिकेमध्ये आजची तरुण पिढी, कॉलेजमधील फ्रेशर्सची अतरंगी यारी, त्यांच्या कॅम्पसमधली धमाल दाखवली गेली होती. 

 

 

मिताली मयेकर नुकताच एक व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये फ्रेशर्सच्या टीमचं रियुनियन दिसतं आहे. या व्हिडियोत ओमकार राऊत, रसिका वेंगुर्लेकर, रश्मी अनपट, अमृता देशमुख, मिताली मयेकर आणि सिद्धार्थ खिरिड दिसत आहेत. ‘आमच्यातील मुल जिवंत ठेवण्याचा प्रयत्न’. या व्हिडियोला चाहतेही चांगला प्रतिसाद देत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive