By  
on  

अभिनेता अंकित मोहन दिसणार आगामी ‘हवाहवाई’ सिनेमात

फर्जंद सिनेमानंतर अभिनेता अंकित मोहन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.  त्यानंतर फत्तेशिकस्त या मराठी सिनेमातही अंकित झळकला. या सिनेमात अंकितने येसाजी कंक यांची भूमिका साकारली होती.  दोन ऐतिहासिक सिनेमात दिसल्यानंतर अंकित आगामी ‘हवाहवाई’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ankit Mohan (@ankittmohan)

 

या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री वर्षा उसगावकरही दिसणार आहेत. या सिनेमाचं नुकतंच रॅप अप झालं आहे.  मराठी तारका फेम महेश टिळेकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. अंकित याशिवाय बाबू या मराठी सिनेमातूनही प्रेक्षकांच्या समोर येतो आहे. यात त्याचा अ‍ॅक्शन पॅक्ड रोल असल्याचं बोललं जात आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive