सध्या करोनामुळे निर्बंध सैलावले असले तरी त्याचा अनेक घटकांना काहीच फायदा होताना दिसत नाही. करोना निर्बंधांमुळे मनोरंजन विश्व गेले दिडवर्षे ठप्प आहे. अशा वेळी कलाकारांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे. अनेक कलाकार सोशल मिडियाच्या माध्यमातून शासनाला जागं करण्याचा प्रयत्न करत आहेत. दिग्दर्शक, अभिनेते केदार शिंदे यांनीही कलाकारांच्या अवस्थेबाबत सरकारला जाब विचारला आहे.
आपल्या पोस्टमध्ये केदार म्हणतात, ‘दोन डोस घेतलेल्यांना ट्रेन प्रवास सुरू होणार.... पण सिनेमागृह नाट्यगृह याविषयी एक चकार शब्द नाही... या कोरोनाची सुरूवात आम्ही कलाकारांनी केली की काय? असं वाटू लागलं आहे.. आमचे कोणीच वाली नाही.. आमच्या वाट्याला सगळे सुग्रीवच!!!!! केदार यांच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत समर्थन दर्शवलं आहे.