By  
on  

प्राजक्ता माळी म्हणते, ‘आई शप्पथ सांगते, तुमच्या प्रेमामुळे तग धरून आहे’

अभिनय, सुत्रसंचालनानंतर आता कवयित्री म्हणूनही प्राजक्ता माळीची ओळख निर्माण झाली आहे. नुकताच 'प्राजक्तप्रभा' हा कवितासंग्रह प्राजक्ताने प्रकाशित केलाय. प्राजक्ताच्या चाहत्यांना आता तिच्या लेखणीतून तयार झालेल्या कविता वाचता येत आहेत. ज्यात प्राजक्ताने तिच्या आयुष्यातील अनुभवातून केलेल्या मराठी, हिंदी आणि इंग्रजी कविता आहेत. 

 

 

 पण वाढदिवसानिमित्त या काव्यसंग्रहानंतर आणखी एका गोष्टीचा प्राजक्ताला आनंद झाला आहे. प्राजक्ताच्या वाढदिवसादिवशीच तिच्या काव्यसंग्रहाची दुसरी आवृत्ती समोर आली आहे. आपल्या पोस्टमध्ये प्राजक्ता म्हणते, ‘

वाढदिवसाच्या मुहूर्तावर “प्राजक्तप्रभा” ची ‘दुसरी आवृत्ती’ बाजारात आली.
.
#आनंदीआनंदगडे
.
काल तुम्ही वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा अक्षरश: वर्षाव केलात; आभारासाठी शब्द अपूरे पडतायेत .
.
आई शप्पथ सांगते, तुमच्या प्रेमामुळे तग धरून आहे. सदैव ऋणात.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive