महाराष्ट्राची लाडकी अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही मे महिन्यात फियान्से कुणाल बेनोडेकरसह लग्नबंधनात अडकली. दुबईत अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. त्यानंतर लॉकडाऊनमुळे सोनाली कुणालसोबतच दुबईतील त्यांच्या फ्लॅटमध्ये सुखी संसार थाटला. आता मुंबई-दुबई असं करत हे दोघं सुखानं नांदतायत. याचबरोबरीनं सोनालीचं करिअरसुध्दा यशोशिखरावर आहे. तिच्या आगामी प्रोजेक्ट्सची घोषणा होतेय.
तमाशा लाईव्ह या सिनेमातून सोनाली प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. प्रसिध्द दिग्दर्शक संजय जाधव या सिनेमाचं दिग्दर्शन करतायत.
सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणा-या सोनालीने तिचे हे काही मनमोहक गुलाबी लेहंगा चोली मधले फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत.
सोनालीचं हे मनमोहक फोटोशूट पाहून तुम्ही म्हणाल, हे गुलाबो जरा इत्र गिरा दो
गुलाबी रंगाच्या या सुंदर लेहंगा-चोलीमध्ये अप्सरेच्या सौंदर्याला चार चॉंद लागले आहेत.