By  
on  

‘सिटी ऑफ ड्रीम्स 2’ ला प्रतिसाद दिल्याबद्दल आदिनाथ कोठारेने मानले चाहत्यांचे आभार

‘सिटी ऑफ ड्रीम्स’ च्या घवघवीत यशानंतर दुस-या सीझननेही प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या सिरीजच्या दमदार मराठमोळ्या स्टारकास्टने तर सगळ्यांचचं लक्ष वेधलं आहे. सिरीजमध्ये येत असलेल्या ट्वीस्टनी ती अधिकच रंजक बनवली. आताही ‘राजकारण, सत्ता, नाती यातील गुंतागुंत आणि रहस्य यावर आधारित दुस-या सीझनने प्रेक्षकांची वाहवा मिळवण्यास सुरुवात केली आहे. 

 

 

या सिरीज मध्ये सरप्राईज पॅकेज असलेल्या आदिनाथ कोठारेने खास पोस्ट केली आहे. ‘आदिनाथ म्हणतो, ‘सिटी ऑफ ड्रीम्स ला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. गेल्या 10 दिवसात ही सिरीज 76 लाख लोकांनी पाहिली. या सिरीजला या वीकेंडला सर्वात जास्त  पाहिली गेलेली सिरीज बनवल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार.’ अशा आशयाची पोस्ट त्याने केली आहे. आदिनाथ या सिरीजमध्ये महेश आरवले या व्यक्तिरेखेत दिसतो आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive