By  
on  

कैलाश वाघमारे आणि मीनाक्षी राठोडची प्रमुख भूमिका असलेला ‘हिरवी’ सिनेमाचा ट्रेलर समोर

माणूस आणि पर्यावरण एकमेकांशी अतुट बंधनात बांधले गेले आहेत. याच बंधाचा एक एक धागा जपण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे हिरवी सिनेमात. कैलाश वाघमारे आणि मीनाक्षी राठोडची भूमिका असलेल्या ‘हिरवी सिनेमाचा ट्रेलर समोर आला आहे. साग वृक्षाच्या पर्यायाने हिरवाईच्या संवर्धनासाठी धडपडणा-या शिक्षकाची गोष्ट यात दिसते आहे.

 

 

अभिनेत्री प्रार्थना बेहरेनेही या सिनेमाचा ट्रेलर पोस्ट करत दिग्दर्शक अ‍ॅग्नेल रोमन यांचं कौतुक केलं आहे. अ‍ॅग्नेल रोमन हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. कैलाश आणि पत्नी मीनाक्षी राठोड या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive