By  
on  

डिंपल को सिंपल मत समझना ! पाहा 'देवमाणूस' फेम अस्मिता देशमुखचे हे फोटो

देवमाणूस मालिकेत देवी सिंगच्या काळ्या कारनाम्यांना खतपाणी घालणारी आणि बडी हिरोईन बनण्याचं स्वप्न बघणारी सर्वांची लाडकी डिंपल महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलीय. टोन्याची ही लाडकी दीदी सतत डिंपल को सिंपल मत समझना म्हणून मालिकेत संवाद फेक करत असते. डिंपल साकारणारी अभिनेत्री अस्मिता देशमुख ख-या आयुष्यात पण तितकीच स्टायलिश आहे.  

'देवमाणूस'  ही मालिका आता निरोपाच्या उंबरठ्यावर आहे.

या मालिकेत डिंपलची व्यक्तिरेखा चांगलीच गाजतेय. डॉ. अजित कुमार देवच्या कुकर्मात ती त्याला साथ देतेय. 

  डिंपलच्या अवखळपणाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. 

डिंपलची व्यक्तिरेखा साकारली आहे अस्मिता देशमुखने. अस्मिता मुळची पुण्याची आहे. देवमाणूस ही तिची पहिली मालिका आहे.

पुणे इथल्या हुजूरपागा गर्ल्स हायस्कूल या शाळेत अस्मिताने शिक्षण पूर्ण केलं.

 

अस्मिताने 'एसएनडीटी' विद्यापिठातून सायकोलॉजी ही पदवी घेतली.

अस्मिताने काही शॉर्टफिल्म्स, म्युझिक व्हिडिओ आणि नाटकांमध्येही काम केलं आहे.

 

देवमाणूस मालिकेमुळे अस्मिताचा खुप मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive