By  
on  

प्रियदर्शन जाधवच्या आगामी ‘लवसुलभ’चं शुटिंग पुर्ण

अभिनेता, दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव आगामी लव सुलभ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रियदर्शन सांभाळतो आहे. या सिनेमाचं शुटिंग नुकतंच पुर्ण झालं आहे. प्रियदर्शनने पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. या सिनेमामुळे लेखन आणि दिग्दर्शन प्रियदर्शन जाधव याने केलं आहे. या सिनेमात प्रियदर्शन जाधवसह प्रथमेश परब, ईशा केसकर, मंगेश देसाई आणि प्रवीण तरडे हे कलाकार आहेत. 

 

 

या सिनेमाच्या नावामुळे याबाबतची उत्सुकता वाढली आहे. प्रियदर्शन म्हणतो, ‘या काळात सहकार्य करणा-या प्रत्येकाचे आभार. अनेक अडचणींवर टीमच्या मदतीने मात करत अखेर आम्ही जे मिळवायचं ते मिळवलं आहे. सिनेमाला तुम्ही उत्तम प्रतिसाद द्याल अशी आशा आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive