मागील वर्षी लॉकडाऊनमुळे सगळेच घरी होते. या दरम्यान प्रियांका बर्वेने चक्क घरीच एक गाणं रेकॉर्ड केलं. विशेष म्हणजे गर्भवती असताना तिने कृष्णावरील या गाण्याचं रेकॉर्डिंग केलं. या रेकॉर्डिंगची गोष्ट सांगताना प्रियांका म्हणते, ‘मागच्या वर्षी २०२० मधे याच सुमारास आम्ही 'नटखट मेरा कृष्णकन्हैया' या गाण्याचं recording आणि video shooting केलं.
माझ्या आईनं लिहिलेलं हे गाणं प्रांजूनं,
माझ्या बहिणीने स्वरबद्ध केलं.
आणि सारंगनं संगीत संयोजन केलं.
वरदनी त्यात सुंदर बासरी वाजवली.
मला मिळालेलं हे डोहाळजेवणाचं गिफ्ट! लॉकडाऊन असल्यामुळे प्रांजूनं माझ्या iphone वर शूट केलं .मी सारंगची मदत घेउन एडिट केलं. पुढच्या १० दिवसांनी युवान चा जन्म झाला. आता मागे वळून पाहताना खूप छान वाटतंय. आमच्या नटखट कन्हैयाला एकदम साजेसं झालंय हे गाणं..!’ मागील वर्षी ऑगस्टमध्ये प्रियांकाने आई झाल्याची बातमी चाहत्यांशी शेअर केली होती.