लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’त ‘अनघा’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने श्रावण महिन्याच्या मुहूर्तावर एक नवे फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमधील तिचे लुक्स प्रचंड चर्चेत आहेत.
मराठमोळ्या साजात सजलेली अश्विनी खुपच सुंदर आणि आपल्याला जुन्या काळात घेऊन जाणारी दिसतेय.
पारंपारिक नऊवारी साडी, गळ्यात ठुशी नाटकात नथ, कानात सुवर्णफुलं असा पारंपारिक साजात अश्विनी सजली आहे.
अश्विनीच्या या भरजरी रुपाच्या प्रेमात चाहते पाहताक्षणी पडले आहेत.
स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कन्येची अर्थात ‘राणू अक्कां’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचली आहे.
अभिनेत्री अश्विनी महांगडे रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान नावाने सेवाभावी संस्थादेखील चालवते. त्याद्वारे् ती गरजूंना मदत करते. ती समाजकार्यात नेहमीच पुढाकार घेताना पाहायसला मिळते.