By  
on  

‘वीरे दी वेडिंग’ मध्ये दिसलेली ही अभिनेत्री झळकतीये या मराठी सिरीजमध्ये

मराठी कलाकार हिंदी सिनेमा आणि सिरीजमध्ये दिसणं आता नवीन नाही. पण हिंदी कलाकारांनाही मराठी सिनेमा खुणाऊ लागला आहे. वीरे दी वेडिंग, कुली नं. 1, वेक अप सिड या सिनेमांतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री शिखा तलसानिया आता मराठी सिरिजमध्ये दिसते आहे. 

 

 

शिखा शांतीत क्रांती या सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ३ बेस्ट फ्रेंड्स श्रेयस, प्रसन्न आणि दिनार यांची गोवा ट्रीप यावर हा सिनेमा बेतला आहे. शिखा या सिनेमात योगा ट्रेनरची भूमिका साकारते आहे. शिखा या भूमिकेसाठी मराठी शिकली देखील आहे. भाडिपा फेम  सारंग साठे आणि पॉला मॅकग्लिन हे या सिरीजचे दिग्दर्शक आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive