By  
on  

Elephant day : पुजा सावंत म्हणते, ‘त्यांचा विश्वास संपादन करता आला यासाठी मी सुदैवी’

अभिनेत्री पुजा सावंत प्राण्यांच्या हक्काबाबत जागरुक असते. अनेकदा ती रेस्क्युमध्येही महत्त्वाची भूमिका बजावताना दिसते. पण पुजाची हत्तींसोबत खास मैत्री आहे. पुजाने ‘जंगली’ या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केलं. यामध्ये तिने माहुताची व्यक्तिरेखा साकारली होती. यादरम्यान तिची हत्तींशी खास मैत्री झाली. आज जागतिक हत्ती दिनानिमित्त तिने खास फोटो आणि व्हिडियो शेअर केला आहे.

 

 

यामध्ये तिने हत्तींसोबतचा व्हिडियो शेअर केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये पुजा म्हणते, ‘ मी स्वत:ला सुदैवी समजते की मी त्यांचा विश्वास संपादन करु शकले. त्यामुळे ते मला त्यांच्या आसपास असू देतात. जागतिक हत्ती दिनाच्या शुभेच्छा.’ पुजा आगामी ‘दगडी चाळ 2’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive