‘राजा राणी ची गं जोडी’ मधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी राणी म्हणजे संजीवनी. संजीवनीची भूमिका साकारणारी शिवानी आज घराघरात लोकप्रिय आहे. अवखळ मुलगी, समंजस पत्नी आणि जबाबदार पोलिस अधिकारी यामध्ये शिवानीने उत्तम अभिनय साकारला आहे. अलीकडेच शिवानीचा वाढदिवस झाला. यावेळी फॅन्सनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
पण एक खास गिफ्टही यावेळी शिवानीला मिळालं. मालिकेत कुसुमावतीच्या भूमिकेत दिसणा-या शुभांगी गोखले यांनी शिवानीसाठी खास चिट्ठी लिहिली आहे. यात त्या म्हणतात, ‘वाढदिवसानिमित्त शुभेच्छा आहेतच. पण कलाकार आणि चांगली सहकलाकार म्हणून तुझं हे कौतुक आहे.’ अशा आशयाचं हे पत्र आहे. याशिवाय You are a very god performer असं म्हणत त्यांनी शिवानीचं कौतुक केलं आहे. शिवानी आपल्या पोस्टमध्ये म्हणते, ‘आणि काय हवं? सगळ्यात जास्त जवळच आणि सगळ्यात जास्त आवडलेल gift’ .