By  
on  

Elephant day: सायली संजीवने ही पोस्ट शेअर करत दिला महत्त्वाचा संदेश

आज जागतिक हत्ती दिवस आहे. कळपाने राहणा-या या शाकाहारी प्राण्याच्या संवर्धन आणि जतन करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. आजच्या दिवसाचं औचित्य साधत अनेक सेलिब्रिटींनी आपल्या भावना जाहीर केल्या आहेत. पण अभिनेत्री सायली संजीवने मात्र अनोख्या पद्धतीने या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सायलीने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तिच्या पायांच्या नखांना ग्रे कलरचं नेलपेंट लावलं आहे. 

 

 

पाळीव हत्तींच्या पायांच्या दुखापतीबाबत लक्ष वेधण्यासाठी तिने हा फोटो पोस्ट केला आहे. यासोबतच तिने चाहत्यांनाही हे करण्याचं आवाहन केलं आहे. सायली सध्या शुभमंगल ऑनलाईन या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive