By  
on  

कोल्हापूर शहराचं नाव बदलून कलापूर ठेवण्याची सचिन पिळगावकर यांची मागणी

मराठी सिनेसृष्टीने बाळसं कुठं धरलं असेल तर ते कोल्हापुरात. चित्रमहर्षी बाबूराव पेंटर यांनी मराठी सिनेसृष्टी कोल्हापुरात रुजवली आणि वाढवली. त्यामुळेच सचिन पिळगावकर यांनी कोल्हापुरचं कलापूर असं नामांतरण करण्याची मागणी केली आहे. कोल्हापूरची ओळख सिनेमाचं गाव अशी बनली होती त्यामुळेच त्यांच नाव कलापूर असं ठेवलं जाव हे त्यांनी सुचवलं आहे.  

एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी ही मागणी केली आहे. पुर्वी कोल्हापुरला ‘कलापूर’ असं बोललं जात असं. ज्याप्रमाणे इंग्रजांनी ‘मुंबई’ शहराचं नाव उच्चारताना बदलून ‘बॉम्बे’ असं केलं होतं, अगदी त्याचप्रमाणे ‘कलापूर’चा अपभ्रंश होऊन ‘कोल्हापूर’ झालं आहे. असं ते म्हणाले याशिवाय ही मागणी पुर्ण करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive