मनोरंजनविश्वातल्या चंदेरी दुनियेत चमकण्याचं अनेकांचं स्वप्न असतं आणि हे स्वप्न मेहनत व जिद्दीच्या बळावरच पूर्ण होतं. अनेकदा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील, लहान-मोठ्या भागांतील मुलं-मुली हे स्वप्न पाहतात,पण प्रत्येकाचंच ते पूर्ण होतं असं नाही. पण विदर्भातल्या या मुलीने बॉलिवूडमध्ये मजल मारत सर्वांसमोरच एक मोठं उदाहरण प्रस्थापित केलं आहे. अभिनेत्री प्रीती नारनवरेने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली आहे. प्रीतीने तर बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमारसोबत काम केले आहे. याविषयी प्रीतीने एका मुलाखतीत सांगितले आहे.
प्रीतीने ‘सकाळ’ला मुलाखत दिली, त्यावेळी तिने तिचा संपूर्ण प्रवासा विषयी सांगितले आहे. प्रीतीने अक्षय कुमारच्या ‘फिलहाल’ या अल्बममध्ये काम केले आहे. कॉलेजमध्ये असताना प्रीतीला मॉडेलिंगमध्ये आवड निर्माण झाली. त्यानंतर तिने कॉस्मॅटिकमध्ये पदवीचे शिक्षण घेतले. त्यासाठी ती नागपूरला गेली. त्यानंतर तिने मॉडेलिंग करायला सुरुवात केली. यानंतर तिचा खरा मॉडेलिंगचा प्रवास सुरु झाला. आता पुढे जर मॉडेलिंगमध्ये करिअर करायचे असेल तर मुंबईला जावे लागेल याची तिला कल्पना होती.
प्रितीचे भाऊ-बहिण हे दोघंही डॉक्टर आहेत तरीही घरच्यांनी तिवा मनोरंजन क्षेत्र निवडण्यासाठी एक संधी दिली आणि तिने तिचं सोनं केलं. प्रितीने आत्तापर्यंत दहा नाटक, सात मराठी चित्रपट आणि तब्बल १४ मालिका व वेब सीरिजमध्ये काम केले. या पाच वर्षात अक्षय कुमार, विक्की कौशल, मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर, आदित्य रावल अशा अनेक कलाकारांसोबत प्रीतीने काम केले आहे