By  
on  

फोटोतल्या या मराठी अभिनेत्रीला ओळखणं झालंय कठिण

सर्वच कलाकार हे सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतात. विविध फोटोशूटमधून ते रसिक प्रेक्षकांची मनं जिंकतात. कधी कधी कलाकार आपले बालपणीचे किंवा आयुष्यातील त्या दिवसांचे फोटो पोस्ट करतात जेव्हा त्यांनी नाव कमावलेलं नसतं. करिअरच्या उंबरठ्यावर ते असतात. चाहत्यांनासुध्दा त्यांचे ते फोटो पाहून बरंच आश्चर्य वाटतं. अशाच या अभिनेत्रीचा हा फोटो पाहून ही तिच आहे का यावर विश्वास ठेवणं कठीण जाईल.

सुख म्हणजे नक्की काय असतं या लोकप्रिय मालिकेत शालिनी वहिनींचा किती दरारा आहे, हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा फोटो आहे अभिनेत्री माधवी निमकर हिचा. मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये तिचा समावेश होतो. पण तिचा हा फोटो पाहून तिच्यात झालेला बदल पाहून अनेकांनी आश्चर्य वाटल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

 

माधवी ही प्रचंड फिटनेस फ्रिक आहे. तिच्या सौंदर्यांसोबतच तिच्या फिटनेसचं नेहमीच कौतुक होतं. मालिका विश्वात माधवीचं मोठं नाव आहे. विविध भूमिकेतून तिने आपल्या ्भिनयाची छाप पाडलीय. 

 'अवघाची संसार', 'जावई विकत घेणे', 'स्वप्नांच्या पलीकडे' या मालिकांमध्ये तर अनेक सिनेमांमध्येसुध्दा माधवीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. 

जाहिरात क्षेत्रातसुध्दा माधवी कार्यरत असते. अभिनेता अक्षय कुमारसोबतही ती जाहिरातीत झळकली आहे. 

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive