By  
on  

सीझर डिलिव्हरीवरुन ट्रोल करणा-यांना उर्मिला निंबाळकरने दिलं हे सडतोड उत्तर

लोकप्रिय अभिनेत्री आणि युट्यूबर उर्मिला निंबाळकर नुकतीच आई झाली. ती सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते.  सोशल मीडियावर पोस्ट करत तिने ही गोड बातमी चाहत्यांना सांगितली. परंतु, चाहत्यांनी तिला नॉर्मल डिलिव्हरी झाली की सीझर, असा प्रश्न विचारून भंडावून सोडलं. चाहत्यांच्या या प्रश्नावर उर्मिलाने कोणताही आडपडदा न ठेवता उत्तर दिलं. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत उर्मिलाने तिचं सीझर झाल्याचं सांगितलं. सोबतच सिझेरिंग झालं तर त्यात त्या स्त्रीला नावं ठेवण्याचं काहीचं कारण नाही, सीझर फक्त तिच्या चुकीमुळे होत नसल्याचं सांगत चाहत्यांना योग्य भाषेत समजावलं आहे. 

उर्मिलाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिलं, 'अजून १०० व्या व्यक्तीनं विचारायच्या आधीच ही पोस्ट! या पोस्टचं कारणही मी याचं उत्तर कोणतंही दडपण किंवा कमीपणा न घेता देऊ शकते म्हणून, परंतु इतर स्त्रियांना या इतक्या खाजगी प्रश्नाचा त्रास होऊ शकतो. कारण यातही तीची तुलना केली जाऊन तिचे मानसिक खच्चीकरण केलं जातं. माझं सी सेक्शन झालं. डिलिव्हरीनंतर बाळ आणि मी दोघेही अतिशय सुदृढ आणि सुखरुप आहोत पण तरीही सीझर होण्याची माझी कारणं खालीलप्रमाणे. एक म्हणजे माझं ओटीपोटाचं, कंबरेचे हाड किंवा साचा आणि बाळाचं डोकं हे समान मापाचं नव्हतं. बाळाचं डोकं हे मोठं असल्याकारणाने गर्भारपणात कितीही व्यायाम किंवा योग्य आहार घेतलात तरीही अशा वाढ झालेल्या बाळांची नॉर्मल डिलिव्हरी शक्य नसते. याचं कारण अनुवंशिकता.
 

 

 

दुसरं कारण सांगत उर्मिलाने लिहिलं, 'बाळाच्या भोवती दोनदा नाळ गुंडाळली गेली जी इमर्जन्सी नव्हती पण त्यामुळे बाळ बाहेर येणं किंवा खाली घसरणं केवळ अशक्य होतं. गर्भारपणातला आहार आणि व्यायाम हे चोख पार पाडून मीही नॉर्मल डिलिव्हरी होण्याच्या प्रयत्नांतच होते आणि नॉर्मलसाठीच प्रयत्न करायला हवा परंतु कोणत्याही योग्य वैद्यकीय कारणांमुळे झालेली सीझर डिलीव्हरीही तितकीच नॉर्मल आणि नैसर्गिक आहे त्यात त्या स्त्रीला नावं ठेवण्याचं कारण नाही. नॉर्मल असो वा सी- सेक्शन, बाळ आणि आई सुदृढ असण्याला प्राधान्य हवे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive