By  
on  

या नव्या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकतोय संकर्षण क-हाडे

सध्या झी मराठीवर नव्या मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाल्या आहेत. अनेक मोठेमोठे कलाकार छोट्या पडद्याकडे वळतायत. या सर्व मालिकांचे प्रोमो, टिझर सोशल मीडियावर प्रसारित झाले आहेत. हे पाहून प्रेक्षकांना या नवीन मालिका कशा असतील याची उत्सुकता लागली आहे.झी मराठीवरून प्रसारित होणा-या 'तुझी माझी रेशीम गाठ' मालिकेत अनेक प्रसिद्ध कलाकार दिसणार आहेत.श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकतेय. पण या दोघांसोबतच अभिनेता संकर्षण क-हाडे महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. 

'तुझी माझी रेशीम गाठ' मालिकेत अभिनेता,सूत्रसंचालक आणि लेखक अशा तिहेरी भूमिका उत्तमपणे साकारणारा संकर्षण क-हाडे देखील दिसणार आहे. अलिकडेच संकर्षणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तो एका व्यक्तीसोबत बसलेला दिसत आहे. परंतु त्या व्यक्तीचा फोटो ओळखता येऊ नये म्हणून त्यावर इमोजी टाकला आहे. 

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive