गायक, दिग्दर्शक अवधुत गुप्ते सोशल मिडियाच्या माध्यमातून, युट्युब चॅनेलच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो. आताही त्याने एक खास व्हिडियो शेअर केला आहे. या व्हिडियोमध्ये अवधूतसोबत त्याची बेस्ट फ्रेंड त्याची आईही आहे. अवधुतने हा व्हिडियो ऑर्गन डोनेशन म्हणजेच अवयवदानासंदर्भात बनवला आहे.
अवधुतच्या आईला फुफ्फुसं प्रत्यारोपणाची गरज आहे. यासाठी त्यांच्यावर चेन्नईमध्ये उपचारही सुरु आहेत. यादरम्यान अवधूतने अवयव दान आणि प्रत्यारोपण याबाबतची माहिती चाहत्यांशी शेअर केली आहे. त्यातच आज अवयव दान दिनाचं औचित्य साधत अवधुतने अवयव दानाकडे सकारात्मकेतेने पाहण्याचं आवाहनही केलं आहे.