By  
on  

रवी जाधव दिग्दर्शित 'अनन्या' सिनेमाचं मोशन पोस्टर आलं समोर

मराठी रंगभूमीवर गाजलेल्या 'अनन्या' नाटकाचं कथानक आता सिनेमाच्या रुपात दिसण्यासाठी सज्ज झालं आहे. अभिनेत्री ऋता दुर्गुळे या सिनेमात मध्यवर्ती भूमिकेत दिसण्यासाठी सज्ज झाली आहे. या सिनेमातून ऋता सिनेमात पदार्पण करते आहे. या सिनेमाचं मोशन पोस्टर नुकतंच समोर आलं आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hruta (@hruta12)

 

ऋताने तिच्या सोशल मिडियावरुन हे पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, ‘अडथळ्यांना मारून 'लाथ' जी संकटांवर करते 'मात' तीच खरी अनन्या!!! शक्य आहे. तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे! सादर आहे मराठी चित्रपट ‘अनन्या’ चे पहिले ऑफिशिअल मोशन पोस्टर’ या पोस्टरमध्ये ऋताचा लूक हटके दिसतो आहे. प्रताप फड या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. तर ड्रीमव्हिवर एंटरटेन्मेंट आणि रवी जाधव फिल्म्सच्या ध्रुव दास आणि प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक रवी जाधव यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे तर मेघना जाधव आणि सतीश जांभे हे सहनिर्माते आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive