मराठीसोबत हिंदीतही आणि मुख्यत्वे आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी मराठमोली प्रसिध्द अभिनेत्री राधिका देशपांडे ट्विटरवर ट्रेंड होतेय. पण तिच्या कुठल्या सिनेमा किंवा वेबसिरीजसाठी नव्हे तर बॉयकॉट राधिका म्हणून ट्रेंड होतेय.
पार्च्ड हा २०१६ मध्ये रिलीज झालेल्या सिनेमातील काही बोल्ड सीनचे फोटो ट्विटरवर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमुळे राधिकाला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
Bollywood always targets the ancient religion and traditions of Bharat.#BoycottRadhikaApte
— Nill hindu (@nilhindu07) August 13, 2021
काही युझर्सने 'राधिकामुळे भारतीय संस्कृतीची बदनामी होत आहे,' असं म्हटलं आहे.
राधिकाच्या या बोल्ड फोटोंमुळे तिला ट्रोल केले जात आहे. अनेक युझर्सने या फोटोंवर आक्षेप नोंदवला आहे. हिंदी सिनेमांमधून अशा पद्धतीने बोल्ड सीन दाखवले जातात. त्यामुळे भारतीय संस्कृतीची बदनामी होतेच. त्याचप्रमाणे देशात अश्लिल सिनेमा पाहण्याचे प्रमाणही वाढते, असे मत काही युझर्सनी नोंदवले आहे.
Shame On Bollywood.
Bollywood is destroying Indian Culture #BoycottRadhikaApte pic.twitter.com/FNIVjKc5Xw
— Gouranga Debnath (@BjpGouranga) August 13, 2021
दरम्यान, राधिका आपटेच्या कामाबद्दल सांगायचे तर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला 'रात अकेली है' या सिनेमात ती दिसली होती. या सिनेमात राधिकाबरोबर नवाजुद्दीन सिद्दीकी सोबत तिची केमिस्ट्री पुन्हा एकदा पाहायला मिळाली. आता राधिका 'मोनिका ओ माय डार्लिंग' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.