By  
on  

'फॅन्ड्री'च्या शालूने ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर म्हणते, 'मर्दानगी दाखवायची असेल तर ..'

फॅन्ड्री सिनेमातली जब्याची शालू तुम्हाला आठवतेय ना...साधी भोळी दोन वेण्या घातलेली.. होय तिच शालू फेम अभिनेत्री राजेश्वरी खरात ही सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असते. आपले नानाविविध दिलखेचक फोटोशूट आणि रील व्हिडीओंच्या माध्यमातून चाहत्यांना ती  घायाळ करते.

सोशल मिडीयावर राजेश्वरीचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. 

 

पण नुकतंच राजेश्वरीला ट्रोल करण्यात आलं आहे. ते पण तिने पोस्ट केलेल्या एका डान्स व्हिडीओवरुन काही ट्रोलर्सनी तिला ट्रोल केलं आहे. 

 

या डान्स व्हिडीओवर ट्रोलर्सना सणसणीत उत्तर देत राजेश्वरी लिहते, अरे यार, मी काय म्हणतेय..
तुम्ही सर्वजण माझ्यावर एवढे प्रेम करता माझ्या सर्व post तुम्हा सर्वांमुळे चर्चेत येतात, त्यासाठी मी तुम्हा सर्वांचे खरच मनापासून आभार मानते.
आणि फक्त एवढेच सांगते की, मला troll झाल्याने काही एक फरक पडत नाही मित्रांनो.
फक्त एवढाच जोर असेल, पुरुषत्व (मर्दानगी) दाखवायची जास्तच हाैस असेल तर एका मुलीच्या comment box मध्ये दाखवण्यापेक्षा तुमच्या नेत्या समोर दाखवा.
मला बोलता ना, पूरग्रस्तांसाठी काही केले का, की फक्तं shorts घालून नाचतेय etc .. अरे मूर्खांनो, या सर्व कामांसाठी सरकार प्रशासन जबाबदार आहे, तुम्ही ज्याला निवडून दिले तो so called "साहेब, नेता" जबाबदार आहे मी नाही.
तेथे गार पडता म्हणुन कोणालाही जोर दाखवायचा ???
मी मान्य करते की सर्वांनी मदतीचा हात दिला पाहिजे परंतु आपण जो tax भरतो ना, त्याचा जाब विचारायला पण शिका नाहीतर आहेच माझ्या comment box मध्ये जागा.. Always Welcome

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive