प्रसिध्द अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते तसचं लेखक महेश मांजरेकर यांचा आज वाढदिवस . महेश मांजरेकर यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केलीय. संजय दत्तच्या ‘वास्तव’ या लोकप्रिय ठरलेल्या सिनेमातून महेश मांजरेकर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. दिग्दर्शन आणि लेखनासोबतच महेश मांजरेकर यांना अभिनेता म्हणून चाहत्यांनी मोठी पसंती दिली. खासकरून सलमान खानच्या ‘वांटेड’, ‘दबंग’, ‘बॉडीगार्ड’ अशा अनेक सिनेमांमधून महेश मांजरेकर यांनी विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
मराठीतसुध्दा महेश मांजरेकर यांनी काकस्पर्श, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, दे धक्का , नटसम्राट असे दर्जेदार सिनेमे दिले आहेत. आज महेश मांजरेकर यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेऊयात.
महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नीचे नाव दीपा मेहता असे आहे. दीपा मेहता यांच्यापासून महेश यांना सत्या मांजरेकर आणि अश्वमी मांजरेकर ही दोन मुले आहेत. काही कारणांनी महेश आणि दीपा वेगळे झाले आणि अश्वमी-सत्या ही दोन्ही मुले महेश मांजरेकर यांच्याकडेच राहतात.
दीपा मेहता क्वीन ऑफ हार्टस हा साड्यांचा ब्रँड चालवतात. त्यांची मुलगी अश्वमी मांजरेकर या ब्रँडसाठी मॉडेलिंगचे कामही करते.
सिनेसृष्टीत काम करता करता अभिनेत्री मेधा यांच्या महेश मांजरेकर प्रेमात पडले आणि त्यांच्याशी त्यांनी दुसरा विवाह केला. मेधा आणि महेश मांजरेकर यांना सई मांजरेकर ही एक मुलगी आहे. सई ही सलमान खानच्या दबंग ३ मध्ये नायिका म्हणून झळकली होती.
महेश मांजरेकर हे कुटुंबवत्सल आहेत, कुटुंबासोबत ते जास्तीत जास्तवेळ घालवतात.