By  
on  

पाहा Video : 'ढगाला लागली कळं...' गाण्यावर अमेय वाघसोबत थिरकला विकी कौशल

आपल्या वाघांच्या अमेयची बातच निराळी आहे. मराठमोळ्या अमेय वाघचा स्वॅग आता बॉलिवूडमध्येही दिसणार आहे.  सुपरस्टार विकी कौशलसोबत अमेय झळकणार आहे. त्याच्या चाहत्यांसाठी ही खुप मोठी बातमी आहे. अमेय हा विकी कौशल स्टारर ‘मि. लेले’ या बॉलिवूडपटात काम करतोय. या सेटवरचाच एक बिहाईंड द सीन व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतोय. 
 

'ढगाला लागली कळ...पाणी थेंब थेंब गळं' , या दादा कोंडकेंच्या सुपरहिट गाण्यावर अमेयसोबत विकी धम्माल थिरकताना पाहायला मिळतोय. ‘मि. लेले’ या सिनेमाचे दिग्दर्शक शशांक खैतान यांनी हा बीटीएस व्हिडीओ चाहत्यांशी शेअर केला आहे. या व्हिडीओवर चाहते फिदा झाले आहेत. इथेच या दोघांची भन्नाट केमिस्ट्री पाहायला मिळतेय, तर सिनेमात काय मजा असेल याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. 
 

 

दरम्यान, अमेय वाघच्या एका जबरदस्त स्टायलिश फोटोवर विकी कौशलने अमेय स्वॅग म्हणून कमेंट केली होती. तेव्हासुध्दा अमेयच्या पोस्टवरील विकीच्या कमेंटने नेटक-यांचं लक्ष वेधलं होतं. 

 


 

तसं पहायला गेलं तर अमेयचा हा पहिला बॉलिवूड सिनेमा नाही, यापूर्वी सचिन कुंडलकर दिग्दर्शित अय्या या बॉलिवूडपटात अमेय राणी मुखर्जीसोबत झळकला होता.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive