By  
on  

‘सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेची वर्षपुर्ती, महेश कोठारेंनी शेअर केली पोस्ट

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेला आता वेगळं वळण मिळालं आहे. अलीकडेच या मालिकेत गौरीची मंगळागौर पाहायला मिळाली. पण या मालिकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या मालिकेने नुकतंच एक वर्षं पुर्ण केलं आहे. 
या मालिकेचे निर्माते महेश कोठारे यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.

 

 

 

आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, ‘ 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेला १ वर्ष पूर्ण होत आहे... या १ वर्षाच्या प्रवासात आपण मोलाची साथ दिलीत आणि भरभरून प्रेम केलंत, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार..!! त्याचबरोबर या मालिकेचे लेखक, निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ या सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार..!! आतापर्यंत दिलेली साथ आणि प्रेम असंच पुढे राहो, हीच प्रार्थना..! अशा आशयाची पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive