प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं मागील वर्षी निधन झालं. लिव्हर सिरोसिस या आजाराने त्यांना ग्रासले होते त्यासाठी त्यांच्यावर हैदराबादच्या एआयजी रुग्णालयात उपचारही सुरु होते. मात्र या आजाराशी त्यांची झुंज संपली आणि मागील वर्षी 17 ऑगस्टला त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पहिल्या पुण्यतिथी दरम्यान अभिनेत्री शिल्पा तुळसकर यांनी निशिकांत यांच्यासाठी भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्या आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, ‘ काही नाती खुप जवळची असतात. त्यामुळे त्यांच्या निघून जाण्याने होणारा त्रासही तितकाच मोठा असतो. त्यांच्या आठवणींबाबतही तुम्ही तितकेच पझेसिव्ह होता.
निशीला आठवणींमधून काढणं तितकंस सोपं नाहीये. त्याचा उल्लेख भूतकाळात करतानाही कठीण जात आहे. कदाचित काळ त्याच्यावरचं औषध असेल. त्याच्या पुढील आयुष्यासाठी प्रार्थना.’ निशिकांत कामत यांनी अनेक उत्तमोत्तम मराठी आणि हिंदी सिनेमे प्रेक्षकांना दिले आहेत.