सगळ्या टेंशनपासून लांब ट्रीपला जाण्याचा मोह आपल्यापैकी सगळ्यांनाच होत असतो. अभिजीत खांडकेकरही त्याचं ड्रीम व्हेकेशन एंजॉय करताना दिसतो आहे. या दरम्यान तो अनेकदा व्हिडियो आणि फोटो शेअर करताना दिसतो आहे. या ट्रीपमधले अनुभव तो शेअर करताना दिसतो आहे. या पोस्टमध्ये तो म्हणतो, ‘लदाख ला जाणं आणि बाईक वरून लदाख अनुभवणं हे अनेकांच स्वप्न असतं… माझ्या लदाख सहली मध्ये मी काही अप्रतिम लोकांना भेटलो ज्यांच्यामुळे ही सहल अविस्मरणीय झाली.
त्यापैकीच एक म्हणजे कुडाळ- मालवण मधून आलेले #kudalbikers .
ज्यांच्यामुळे जगातल्या सर्वात उंच (आता दुसर्या क्रमांकावर ) वाहन चालविता येईल अश्या रस्त्यावर,खारदुंगला टॅाप वर बुलेट वर जाण्याचं स्वप्न पूर्ण करता आलं. #kudalbikers @ishatours @bhataktaatma_ @skrane68 ह्यांचे मनापासून आभार..
आमची ही यशस्वी सहल भारतमातेसाठी प्राणांची आहुती दिलेल्या सगळ्या वीर शहीदांना, भारतीय सेनेच्या जवानांना आणि नुकतच टोकियो olympics मध्ये पदक जिंकलेल्या सर्व खेळाडुंना समर्पित’ सध्या अभिजीत 'क्रिमिनल्स - चाहूल गुन्हेगारांची' या शो चं सुत्रसंचालन करतो आहे.