By  
on  

'आई कुठे काय करते'मधील ही अभिनेत्री झळकतेय हिंदी मालिकेत, जाणून घ्या

आई कुठे काय करते या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळतोय. या मालिकेचा विषय आणि पात्र हे प्रेक्षकांना आपलेसे वाटू लागले आहेत. ही एक कौटुंबिक मालिका असून रसिकांच्या प्रचंड आवडीची आहे. या मालिकेतल्या सर्वच व्यक्तिरेखा लोकप्रिय आहेत. या मालिकेत आपल्या लाघवी आणि मनमिळावू स्वभावाने सर्वांचीच मनं जिंकणारी अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडे खुपच  लोकप्रिय आहे. 

अनघा आता लवकरच हिंदी टेलिव्हिजनवर पदार्पण करतेय, अभिनेत्री अश्विनी महांगडे हिनेच आपल्या सोशल मिडीयावरुन आपण मेरे साई या कार्यक्रमात झळकणार असल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. त्यासोबतच या मालिकेच्या सेटवरचे तिचे काही सुंदर फोटोसुध्दा तिने पोस्ट केले आहेत. या मालिकेत ती तेजस्वी ही भूमिका साकारतेय. अश्विनी या भूमिकेसाठी प्रचंड उत्सुक असल्याचं तिने पोस्टमध्ये म्हटलंय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive